प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मोटर लोडरांचे कामबंद आंदोलन; सेवाधारित कंत्राट पद्धतीविरोधात कर्मचारी आक्रमक; भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवईत कचऱ्याचे ढीग

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा संकलनासाठी सेवाआधारित (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट पद्धती लागू करण्यास सुरुवात करताच त्याला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर एस वॉर्डमध्ये (भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई) सुरू होताच २५० हून अधिक मोटर लोडर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा संकलनासाठी सेवाआधारित (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट पद्धती लागू करण्यास सुरुवात करताच त्याला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर एस वॉर्डमध्ये (भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई) सुरू होताच २५० हून अधिक मोटर लोडर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे परिसरातील अनेक भागांत कचरा उचलण्याचे काम विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत. दरम्यान, हे आंदोलन इतर वॉर्डमध्येही पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत दररोज सुमारे ७,२०० मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. हा कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दररोज सुमारे १,३३४ वाहने कार्यरत असतात. यामध्ये महापालिकेची तसेच कंत्राटदारांची वाहने वापरली जातात. या वाहनांवर कार्यरत असलेले मोटर लोडर कर्मचारी रस्त्यावरील कचरा उचलून वाहनांमध्ये भरण्याचे महत्त्वाचे काम करतात.

मनुष्यबळ कंत्राटदार पुरवणार

महापालिकेने आता २६ पैकी २२ वॉर्डमध्ये सेवाआधारित कंत्राट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवस्थेनुसार कचरा वाहतूक, वाहने आणि संबंधित मनुष्यबळ कंत्राटदारांकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे, तर महापालिकेच्या विद्यमान मोटर लोडर कर्मचाऱ्यांना समकक्ष कामांवर पुनर्नियुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, मात्र यालाच कर्मचाऱ्यांचा जोरदार विरोध आहे.

हे आंदोलन खासगीकरणाविरोधात

हे आंदोलन खासगीकरणाविरोधात असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कामावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समकक्ष काम देण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात अशी पदे उपलब्ध नाहीत. या धोरणामुळे भविष्यात नोकरीची सुरक्षितता धोक्यात येईल आणि वारसा हक्काच्या रोजगारावरही परिणाम होईल, असा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केला आहे.

इतर वॉर्डमधील कर्मचारीही आंदोलनाच्या पवित्र्यात

एस वॉर्डमधील आंदोलनानंतर आता इतर विभागांतील मोटर लोडर कर्मचारीही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एफ-उत्तर वॉर्डमध्ये या विषयावर बैठक घेण्यात आली असून प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलनाची झळ इतर वॉर्डमध्ये बसेल आणि घनकचरा व्यवस्थापनासमोर नवे आव्हान निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

TDR वापरला म्हणून जमिनीचे हस्तांतरण नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

वडोदरा-मुंबई टप्पा ३१ ऑगस्टपर्यंत खुला

'ऑथेंटिकेशन बायपास'बाबत सतर्क राहा! केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

Mumbai : मयंक लोहार हत्याकांडानंतर माहीममध्ये आणखी एका तरुणावर चाकूहल्ला; आरोपी फरार

मुंबई, ठाणे, पालघरला पुढील चार दिवस 'यलो अलर्ट'; २ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा; सातही धरणांतील पाणीसाठा खालावल्याने चिंता वाढली