मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला संग्रहित छायाचित्र
मुंबई

BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या २५ फेब्रुवारीला सादर होणार आहे. नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Swapnil S

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या २५ फेब्रुवारीला सादर होणार आहे. नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

२०२५-२६ चा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यावेळी प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

मात्र आता मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे ४ फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प आता २५ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. त्यामुळे २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मार्च २०२२ पासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांच्या हाती पालिकेचा कारभार होता. त्यानंतर बेस्ट उपक्रमाचा तसेच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून तत्कालीन आयुक्तांनी सादर केला होता.

खर्चाचा हिशेब द्या - किशोरी पेडणेकर

८ मार्च २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२६पर्यंत नगरसेवक मुंबई महापालिकेत आल्यापर्यंतचा खर्चाचा हिशेब द्या, कोणाला किती निधी दिला याबाबत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केल्याचे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ७ मार्च २०२२ पासून महापालिका बरखास्त झाल्यानंतर महापालिकेचा कारभार आजमितीपर्यंत म्हणजेच माहे फेब्रुवारी २०२६ पर्यंत महापालिका प्रशासन पहात होते. या कालावधीत चार वर्षांत किती विकासकामे करण्यात आली, महापालिका आयुक्तांकडून स्थायी समिती, सुधार समितीमध्ये आजपर्यंत किती प्रस्ताव, कशाप्रकारे, किती रुपयांची कामे मंजूर करण्यात आली व ती कोणामार्फत मंजूर करण्यात आली आहेत त्याची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. प्रशासकीय कालावधीत आजपर्यंत प्रशासनाने कशाप्रकारे कामे केलेली आहेत याबाबत आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून कामाची माहिती मिळू शकेल, असे किशोरी पेडणेकर यांनी पत्रात नमूद केले.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण