मुंबई

मुंबई, नवी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी उच्चाधिकार समिती; पालिकांच्या कारभारावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. त्या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

Swapnil S

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या पालिका प्रशासनांच्या कारभारावर गुरुवारी उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याचवेळी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील उपाययोजनांवर देखरेख तसेच विविध शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. महानगरातील प्रदूषण अद्याप कमी झाले नसून पालिका प्रशासनांची उदासीनता यातून दिसून येत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. त्या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने पालिका प्रशासनांच्या निष्क्रीयतेवर ताशेरे ओढले तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पालिकांना बजावले.

या आधी दिलेल्या निर्देशांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि शिफारसी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकार समिती स्थापन करत असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

समितीची स्थापना

न्यायालयीन कामकाजामुळे आम्ही विविध पालिका व एमपीसीबीने दाखल केलेली सर्व प्रतिज्ञापत्रे आणि तज्ज्ञ समितीने सादर केलेला अहवाल तपासू शकत नाही त्यामुळे उच्चाधिकार समितीची स्थापना करणे आवश्यक आहे. ही समिती बैठका घेईल, समितीला प्राधिकरणांकडून मदत पुरवली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Thane : 'अनधिकृत होर्डिंग्ज हटवा'; बॅनर दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

'गाडी थांबवली असती तर…'; धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा मृत्यू; वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याचा सहप्रवाशाचा आरोप, VIDEO

इराणचा UAE च्या दोन जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, आठ जण जखमी

कर्मचाऱ्यांसाठी 'हितसंबंधांचा संघर्ष' नियम अधिसूचित; SEBI चे गुंतवणुकीचे नियम कुटुंबीयांनाही लागू; दोन वर्षांचा ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी समाविष्ट

Mumbai : मॅनहोल सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड'; लुकलुकणारे दिवे मॅनहोल दुरुस्तीवेळी महत्त्वपूर्ण ठरणार