मुंबई

साताऱ्यातील १० वर्षाच्या मुलाने केला मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याचा फोन ; चौकशी सुरु

विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवला आहे. ते विमान १० तासांनी तेथून निघणार असून मदतीची आवश्यकता असल्याचं या व्यक्तीने फोनवरुन सांगितलं होतं

Rakesh Mali

मुंबई विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन नवी मुंबईतील डायल ११२ क्रमांकावर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. तपासणीअंती हा फोन साताऱ्यातील १० वर्षाच्या मुलाने केल्याचं उघड झालं.

गुरुवारी नवी मुंबईतील डायल ११२ क्रमांकावर हा दुरध्वनी आला होता. यात विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवला आहे. ते विमान १० तासांनी तेथून निघणार असून मदतीची आवश्यकता असल्याचं या व्यक्तीने फोनवरुन सांगितलं. यानंतर डायल ११२ क्रमांकावरुन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला तात्काळ याबाबतची माहिती देण्यात आली. तसंच दहशतवाद विरोधी यंत्रणा सहार पोलीस, बॉब्म शोधक व नाशक पथकाला सतर्क करण्यात आलं. तसंच पुर्ण विमानतळाची पाहणी करण्यात आली.

यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी फोन आलेल्या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो क्रमांक सातारा येथील असून त्या व्यक्तीला विचारलं असता १० वर्षाच्या अपंग मुलाने चुकून फोन केल्याची माहिती दिली. यानंतर याची माहिती संपूर्ण यंत्रणांना देण्यात आली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक