Mumbai : नेस्को प्रकरणाची पुनरावृत्ती; वरळीतील कॉन्सर्टमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : नेस्को प्रकरणाची पुनरावृत्ती; वरळीतील कॉन्सर्टमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरू

मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित संगीत कार्यक्रमादरम्यान २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार मद्यसेवनाचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Mayuri Gawade

मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत तरुणाची ओळख वृषभ महेंद्र गांगुर्डे अशी झाली आहे. तो आपल्या एका मैत्रिणीसोबत कार्यक्रमाला गेला होता.

प्रकृती अचानक बिघडली

प्राथमिक माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान वृषभने मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याची आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीची प्रकृती बिघडली.

तरुणीची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र वृषभची प्रकृती गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

पोलिस तपास सुरू

६ जून रोजी एनएससीआय डोममध्ये 'द आउटवर्ल्ड बाय क्लांगकुन्स्टलर' (The Outworld by Klangkuenstler) म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. मात्र मृत्यूची घटना याच कार्यक्रमादरम्यान घडली का, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज, उपस्थितांची माहिती आणि इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

नेस्को प्रकरणानंतर पुन्हा चर्चा

काही महिन्यांपूर्वी गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे झालेल्या टेक्नो कॉन्सर्टनंतर दोन एमबीए विद्यार्थ्यांचा संशयित अमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता.

या प्रकरणानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास मोहीम राबवून कथित ड्रग्ज पुरवठादार, विद्यार्थी, सुरक्षा रक्षक, नेस्कोशी संबंधित कर्मचारी आणि कार्यक्रम आयोजकांसह १२ जणांना अटक केली होती.

वरळीतील या नव्या घटनेमुळे पुन्हा एकदा मोठ्या संगीत कार्यक्रमांमधील सुरक्षा, मद्यसेवन आणि इतर संभाव्य धोक्यांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण