Mumbai : उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर

सांताक्रूझ पूर्वेकडील गोळीबार रोड येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Swapnil S

मुंबई : सांताक्रूझ पूर्वेकडील गोळीबार रोड येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काष्टे (५० ) यांचा मृत्यू झाला असून अजय ठाकूर (३०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सांताक्रूझ पूर्व येथील आठव्या गोळीबार रोडवरील व्ही. एन. देसाई रुग्णालयासमोरील ‘भव्य निकेतन’ या गृहनिर्माण संस्थेने आपल्या इमारतीतील अंतर्गत सांडपाणी वाहिनीच्या सफाईचे काम खासगी कामगारांकडे सोपविले होते. हे काम सुरू असताना संबंधित व्यक्तींनी महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेचे सांडपाणी वाहिनीचे मॅनहोल उघडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. सफाईचे काम सुरू असताना दोन कामगार गटारात पडल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.‌ मृत आणि जखमी कामगारांची ओळख अद्याप पटलेली नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ठाण्यातील आरोग्य केंद्रांवर करडी नजर