मुंबई

कोणी दोन डब्यांमध्ये उभे तर कोणी फूटबोर्डवर लटकले; मुंबईकर चाकरमान्यांची तारेवरची कसरत बघून विवेक अग्निहोत्री म्हणाले...

व्हायरल व्हिडिओत लोकल ट्रेन क्षमतेपेक्षा जास्त भरलेली असून पुरुष आणि महिला दोघेही आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. या लोकल ट्रेनमध्ये अगदी प्रथम श्रेणीच्या डब्यात देखील गर्दी पहायला मिळत आहे.

Swapnil S

मुंबई लोकलला शहराची जीवनवाहिनी म्हटले जाते. मात्र, एका व्हायरल व्हिडिओने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या व्हिडिओत प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. काही जण पायदानावर उभे आहेत. तर, काही बंद दरवाज्याच्या पुढे आणि दोन डब्यांमधील अंतरात तोल सांभाळून उभे राहून प्रवास करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओत लोकल ट्रेन क्षमतेपेक्षा जास्त भरलेली असून पुरुष आणि महिला दोघेही आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. या लोकल ट्रेनमध्ये अगदी प्रथम श्रेणीच्या डब्यात देखील गर्दी पहायला मिळत आहे. काहीजण दरवाज्यात असलेला रॉड पकडून आपला तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्विट करत म्हणाले, "मला नेहमीच आश्चर्य वाटते आणि मी खुप गंभीर आहे की, राजकारणी आणि रेल्वे अधिकारी प्रत्येक ३ मिनीटाला ६० किमी प्रती तासाच्या वेगाने त्यांचे स्वत:चे अपयश धावताना पाहतात तेव्हा त्यांना कसे वाटते. दररोज १२-१५ माणसे मारले जातात आणि ४०- ५० जण जखमी होतात, त्यांना काही वाटते का?"

व्हायरल व्हिडिओ या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. रोझी नामक एका एक्स युजरने हा व्हिडिओ नवख्यांसाठी किंवा शहरात नवीन आलेल्यांसाठी नसल्याचे म्हणत शेअर केला आहे. यावर एका युजरने "हे मजेशीर नसून भयानक आहे! लोकांचा त्यांच्या आयुष्याची काळजी नसते", असे म्हटले आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा