Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम

मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक सुरक्षित, सक्षम आणि भविष्यातील गरजांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पिसे ते पांजरापूर जलबोगदा प्रकल्पाला राज्य सरकारने सोमवारी मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक सुरक्षित, सक्षम आणि भविष्यातील गरजांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पिसे ते पांजरापूर जलबोगदा प्रकल्पाला राज्य सरकारने सोमवारी मंजुरी दिली आहे. सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या या जलबोगद्यामुळे पाणीगळती आणि पाणी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असून मुंबईकरांना अधिक सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो.

या तलावांची एकूण साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणी विविध जलवाहिन्यांद्वारे मुंबईत पोहोचवले जाते.

या जलवाहिन्यांचे बाह्य भागात सुमारे ३८० किलोमीटरचे विस्तीर्ण जाळे असून भूमिगत जलवाहिन्यांची लांबी सुमारे ९० किलोमीटर आहे. विद्यमान जलवाहिन्यांमधून पाणी वाहतुकीदरम्यान गळती, अनधिकृत जोडण्या आणि पाणी चोरीसारख्या समस्या निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून महापालिकेने भूमिगत जलबोगद्यांच्या उभारणीचा पर्याय स्वीकारला आहे.

मुंबईतील जलबोगद्यांच्या कामाची स्थिती

१. अमर महल ते वडाळा, परळ आणि अमर महल ते ड्रॉम्बे जलबोगदा- कार्यान्वित होण्याच्या स्थितीत

२. पवई ते घाटकोपर-९० टक्के काम पूर्ण

३. कशेळी ते मुलुंड-या वर्षी काम सुरू-

४. येवई ते कशेळी-कुपक खोदण्याचे काम सुरू

५. धारावी ते घाटकोपर आणि घाटकोपर ते भांडुप जलबोगदा-विविध कामे सुरू

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुणांसाठी देशनिहाय स्किल पासपोर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज

BMC रुग्णालयांना सुरक्षा कवच; बसविणार आग प्रतिबंधक प्रणाली; खर्च २ कोटी ३६ लाख रुपये; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष