Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई 
मुंबई

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई

मुंबईत आगामी दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचा आणि कडक निर्बंधात्मक आदेश जारी केला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत आगामी दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचा आणि कडक निर्बंधात्मक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या विसर्जनादरम्यान तरंगणाऱ्या किंवा पूर्ण विसर्जित न झालेल्या दुर्गा मूर्तीचे फोटो किंवा व्हिडीओ काढणे आणि ते सोशल मीडियावर किंवा इतरत्र प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईचे पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. धार्मिक भावना दुखावू नयेत आणि शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात विविध जलाशयांमध्ये २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा विसर्जन पार पडेल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत

एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्द