मरोळ पोलीस कॅम्पबाहेर मोठा गोंधळ  
मुंबई

Mumbai : पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांची सरकारविरोधात घोषणाबाजी; मरोळ पोलीस कॅम्पबाहेर मोठा गोंधळ

मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील मरोळ कॅम्पमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान मोठा गोंधळ उडाला.

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील मरोळ कॅम्पमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस भरतीचा मंगळवारचा शेवटचा दिवस असल्याने मुलांना मैदानी चाचणीसाठी आत न घेतल्यामुळे वातावरण चिघळले होते. अखेर आंदोलनाचा मार्ग निवडल्यानंतर मुलांना मैदानी चाचणीसाठी आत घेण्यात आले.

गेल्या दोन दिवसांपासून ही मुले भरतीसाठी आलेली असताना कॅम्पबाहेर रस्त्यावर उभी होती. संतापाचा कडेलोट झाल्यानंतर अखेर त्यांना आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. त्यानंतर मुलांना कॅम्पमध्ये घेण्यात आले व मैदान चाचणी घेतली गेली. मरोळ पोलीस कॅम्पमधील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे परिसरातील सोसायट्यांचे प्रवेशद्वारही बंद झाले आहेत. या परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळेच हा सर्व गोंधळ निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

मुंबई पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी मैदानी चाचणीसाठी काही उमेदवारांना ई-मेलद्वारे चाचणीसाठी बोलावण्यात आले होते, तर काहींना कोणताही अधिकृत संपर्क करण्यात आला नसल्याचे समोर आल्याने संतापलेल्या तरुणांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. सकाळपासून प्रवेश न मिळाल्याने उमेदवारांमध्ये मोठा रोष होता, ज्यामुळे मरोळ-मरोशी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे रोखला गेला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त

वाढता गोंधळ आणि आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर रस्त्यावर ठिय्या मांडलेल्या सर्व आंदोलनकर्त्या उमेदवारांना समजूत काढून मैदानी चाचणीसाठी कॅम्पच्या आत प्रवेश देण्यात आला. या कारवाईनंतर मरोळ-मरोशी रस्त्यावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू