Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये मिळणार घरे; एक हजार ‘पीएपी’ घरे ऑगस्टपर्यंत तयार, मुलुंडमधील प्रकल्प मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करणार

धारावीसह अन्य ठिकाणच्या प्रकल्पबाधितांना मुलुंड येथे घरे मिळणार आहेत. मुलुंड पूर्वेला प्रकल्पबाधितांसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Swapnil S

मुंबई : धारावीसह अन्य ठिकाणच्या प्रकल्पबाधितांना मुलुंड येथे घरे मिळणार आहेत. मुलुंड पूर्वेला प्रकल्पबाधितांसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७ हजार ५३१ घरे उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाला मुलुंडवासियांनी विरोध केला, परंतु प्रकल्पाचे काम निश्चित वेळेतच पूर्ण करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला असून मार्च २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. त्याआधी एक हजार घरे प्रकल्पग्रस्तांना ऑगस्टपर्यंत उपलब्ध केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्प कामात अनेक घरे, गाळे बाधित होत असतात. पात्र प्रकल्प बाधितांना घरे, गाळे देणे मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबईत विविध ठिकाणी बाधितांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.‌

मुलुंड पूर्वेला केळकर कॉलेज परिसरात पीएपी घरे बांधण्यात येत आहेत. महापालिकेकडून मुलुंड पूर्वेला सुमारे ३० हजार ९५४ चौरस मीटर क्षेत्रफळावर पाच इमारती बांधण्यात येत आहेत. यामध्ये तळमजला अधिक २२ मजल्यांच्या चार इमारती, तर २५ मजल्याच्या एका इमारतीचा समावेश आहे. या पाच इमारतींमध्ये मिळून एकूण ७ हजार ५३१ सदनिका प्रकल्पाबाधितांसाठी बांधण्यात येत आहेत.

मुलुंडमधील लोकसंख्येत वाढ होणार

प्रकल्पबाधितांना मुलुंडमध्ये घरे उपलब्ध करुन देत असल्याने मुलुंडमध्ये सुमारे ४० ते ५० हजारांने लोकसंख्या वाढणार असून या भागातील पायाभूत सुविधांवर ताण येणार असल्याचा दावा मुलुंडमधील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

असा होत आहे ‘पीएपी’ प्रकल्प

  • भांडुप पश्चिम - १,९०३ सदनिका - मार्च २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

  • प्रभादेवी - ५२९ सदनिका - मार्च २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

  • दहिसर पश्चिम - ८१७ सदनिका - जून २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे.

मान्सूनची गती धीमी, तूर्तास हलक्या सरी; १५ जूनपर्यंत पेरणी नको - सरकारचे आवाहन

इंडिया आघाडीची आज बैठक; काँग्रेससह २३ पक्ष एकत्र येणार

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; १०० जण ताब्यात

Mumbai : ८३५ बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस 

Sindhudurg : वैभव नाईक यांच्या मागे एसीबीचा ससेमिरा