Mumbai : सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचाऱ्यांचे ठाण; विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नसल्याने आश्चर्य (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचाऱ्यांचे ठाण; विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नसल्याने आश्चर्य

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली अधिनियमला वाकवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळातील लिपीक, वरिष्ठ लिपीक, रोखपाल या पदावरील तृतीय श्रेणीचे कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच जागेवर आद्यपही ठाण मांडून आहेत.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदली अधिनियमला वाकवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळातील लिपीक, वरिष्ठ लिपीक, रोखपाल या पदावरील तृतीय श्रेणीचे कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच जागेवर आद्यपही ठाण मांडून आहेत. जून महिन्यात मुंबई मंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. मात्र, मंडळातील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांचा बदल्याच झाल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांनी गेल्या महिन्यात लिपिक, वरिष्ठ लिपीक, रोखपाल या पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. मात्र, या बदल्या करताना गेल्या अनेक वर्षापासून एकाच जागेवर चिकटून बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना हात लावलेला नाही. जुलै महिना निम्मा संपल्याने यावर्षी या कर्मचाऱ्यांच्या बदलीची शक्यता मावळली आहे.

बांधकाम खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक, मंडळ आणि विभागीय कार्यालयात अनेक कर्मचारी निविदा लिपीक, रोखपाल या पदांवर वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या शाखा बदलल्या जात नाहीत.

मुंबई मंडळात ठाण मांडलेले कर्मचारी

आनंद कदम : गेल्या ११ वर्षांपासून मुंबई इलाखा शहर विभागात संगणक पदावर कार्यरत, कंत्राटदारांची देयके देण्याची जबाबदारी

दिपेश इंदुलकर : वरिष्ठ लिपिक म्हणून अधीक्षक अभियंता कार्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून कार्यरत असून यांच्याकडे अर्थ शाखेचा कार्यभार

मनोहर कांबळे : मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात गेली १६ वर्ष कार्यरत. वरिष्ठ लिपीक ते अधीक्षक अशी बढती मिळूनही इतरत्र बदली नाही.

योगेश डांगे : कनिष्ठ लिपिक म्हणून गेल्या ११ वर्षांपासून मुख्य अभियंता कार्यालयात कार्यरत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती