मुंबई

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेने प्रवास करताय? उद्यापासून ३ दिवस ट्रॅफिक ब्लॉक, बघा वेळ आणि पर्यायी मार्ग

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव/कुसगांव दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव/कुसगांव दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. २२ ते २४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या वळवण ते वरसोली टोल नाका येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरून सुरू राहणार आहे. ब्लॉकच्या तिन्ही दिवस दुपारी ३ वाजेनंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सुरू करण्यात येईल. त्यानुसार द्रुतगती मार्गावरील प्रवाशांनी नियोजन करून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा. तसेच वरील कालावधीदरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा

दूरध्वनी क्रमांक- ९८२२४९८२२४ या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा,

असे आवाहन महामंडळाने केले आहे.

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अनेकजण नियमित या मार्गावरून प्रवास करत असतात.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप