संग्रहित छायाचित्र 
मुंबई

तिन्ही रेल्वेवर रविवारी ब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरही ब्लॉक असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरही ब्लॉक असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ आणि गोरेगाव स्टेशनदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.

ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

दिवाळी साजरी करायला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नॅशनल पार्कमध्ये भरधाव बाईकने दीड वर्षांच्या चिमुरडीला उडवले, जागीच मृत्यू

Mumbai : सोसायटीमध्ये खेळत असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल