मुंबई

Mumbai Rain Update : ६ तासांत सांताक्रूझमध्ये विक्रमी पर्जन्यमान; १५१ मिमी पावसाची नोंद

मुंबईत आज मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथे अवघ्या ६ तासांत तब्बल १५१.४ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबईत आज मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथे अवघ्या ६ तासांत तब्बल १५१.४ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

विविध भागातील पर्जन्यमान

आयएमडीच्या आकडेवारीनुसार, सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या सहा तासांच्या कालावधीत विविध विभागात पुढीलप्रमाणे पावसाची नोंद झाली.

विक्रोळी - १४१.५ मिमी

जुहू - ११०.५ मिमी

भायखळा - ९२ मिमी

वांद्रे - ८९ मिमी

कुलाबा - २९ मिमी

त्याआधी, आज (दि.१९) सकाळी ८.३० वाजता २४ तासांत विक्रोळी येथे २५५.५ मिमी, तर सांताक्रूझ येथे २३८.२ मिमी पाऊस पडला होता. मात्र, त्यानंतरच्या अवघ्या सहा तासांत सांताक्रूझने विक्रमी पर्जन्यमानाची नोंद करत सर्व भागांना मागे टाकले.

वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्ते वाहतूक मंदावली असून विमानसेवाही प्रभावित झाली आहे.

हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आजचे राशिभविष्य, ९ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Cardiac Arrest : छातीत दुखतंय? अजिबात वेळ घालवू नका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Heart Health : रोजच्या आहारात 'या' फळांचा समावेश करा; हृदयाच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल