मुंबई

Mumbai : महाशिवरात्रीनिमित्त राणी बागेत जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज'

महाशिवरात्रीनिमित्त बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे येत्या बुधवारी भायखळा येथील राणी बाग (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) पर्यटकांसाठी खुली राहणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे येत्या बुधवारी भायखळा येथील राणी बाग (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) पर्यटकांसाठी खुली राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी राणी बाग बंद राहणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली.

भायखळा परिसरातील राणी बाग साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले राहते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. त्यानुसार बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी ‘महाशिवरात्री’निमित्त राणी बाग जनतेसाठी खुली राहणार आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश