राणी बागेत उभारणार ‘विदेशी प्राणी विभाग’ 
मुंबई

Mumbai : राणी बागेत उभारणार ‘विदेशी प्राणी विभाग’

मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयांच्या १० एकर जागेवर लवकरच ‘विदेशी प्राणी विभाग’उभारण्यात येणार आहे. यामध्ये १८ दुर्लभ आणि विदेशी प्रजातींसाठी आधुनिक निवाऱ्यांची उभारणी केली जाणार आहे.

Swapnil S

पूनम पोळ / मुंबई :

मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयांच्या १० एकर जागेवर लवकरच ‘विदेशी प्राणी विभाग’उभारण्यात येणार आहे. यामध्ये १८ दुर्लभ आणि विदेशी प्रजातींसाठी आधुनिक निवाऱ्यांची उभारणी केली जाणार आहे.

यामध्ये पांढरा सिंह, चित्ता, लिंबूर, झेब्रा यांसारख्या प्राण्यांचा समावेश असणार आहे. यासाठी पालिका अंदाजित ४९८ कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली असून येत्या जानेवारी २०२६ पासून या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. तर या विभागाची संकल्पना थायलंडमधील एचकेएस कन्सल्टंट या कंपनीने तयार केली आहे. 

मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच लहानसह मोठ्यांची राणी बाग. याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राणी बाग प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. त्यानुसार राणी बाग परिसरात लवकरच ‘विदेशी प्राणी विभाग’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या विभागामध्ये ऑस्ट्रेलियन, अमेरिकन आणि आफ्रिकन असे तीन विभाग असणार आहेत. या विभागात १७ स्वतंत्र प्राणी अधिवास करणार आहेत.

Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ

Mumbai : मोनोरेल यंदाही यार्डातच; सुरक्षेबाबत MMRDA सावध

Mumbai : औषधांसाठी हवेत १२०० कोटी, मिळतात ३०० कोटी; पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा, नगरसेवकांनी BMC ला धारेवर धरले

देशात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अंदाज

Sindhudurg : आंबोलीत पुन्हा पट्टेरी वाघाचे दर्शन! स्थानिक युवकांनी टिपलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल