संग्रहित छायाचित्र 
मुंबई

Mumbai : राणी बागेची देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ! दोन वर्षांत ७२ लाखांहून अधिक पर्यटकांची पसंती; BMC च्या तिजोरीत मोठी वाढ

मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीबाग) येथे मागील दोन वर्षांत तब्बल ७१ लाख ८० हजार १३१ पर्यटकांनी बिबट्या, बंगाल टायगर, मगर, अस्वल आदी देशी-विदेशी पशुपक्ष्यांचा थरार अनुभवला, तर जपानी करकोचा, आफ्रिकन करड पोपट पक्षांचा किलबिलाट यामुळे राणी बागेत देशी-विदेशी पर्यटकांना राणी बागेची भुरळ पडली आहे.

गिरीश चित्रे

मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीबाग) येथे मागील दोन वर्षांत तब्बल ७१ लाख ८० हजार १३१ पर्यटकांनी बिबट्या, बंगाल टायगर, मगर, अस्वल आदी देशी-विदेशी पशुपक्ष्यांचा थरार अनुभवला, तर जपानी करकोचा, आफ्रिकन करड पोपट पक्षांचा किलबिलाट यामुळे राणी बागेत देशी-विदेशी पर्यटकांना राणी बागेची भुरळ पडली आहे. राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांमुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीत तब्बल २८ कोटी १० लाख ६४ हजार ३०४ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

कुटुंबासह बच्चेकंपनी तसेच देश-विदेशातील पर्यटकांची रोज राणीबागेत गर्दी होते. शनिवार, रविवार व सुट्टीतून उद्यान व प्राणिसंग्रहालय गजबजून जाते. बागेच्या आधुनिकीकरणाचे काम झपाट्याने सुरू आहे. राणीच्या बागेत नव्याने गुलाबाचे, जपानी उद्यान बनवण्यात आली. मुलांसाठी मनोरंजन खेळणी, देशी व विदेशी पक्षी, वाघ, बिबट्या, सुसर हे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. त्यातच ८ पेंग्विन सन २०१६ मध्ये आणले. आता पेग्विनची संख्या २१ वर पोहोचली असून पेंग्विनची धमालमस्ती अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करत असून त्यामुळे उत्पन्नातही मोठी भर पडत आहे, असे जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

तिकिटाचे दर परवडणारे!

या उद्यानात प्रवेशासाठी प्रति व्यक्ती रुपये ५० रुपये इतके शुल्क असून ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी रुपये २५ रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते, तर आई-वडील आणि १५ वर्षांपर्यंतची २ मुले अशा ४ व्यक्तींच्या कुटुंबासाठी १०० रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

पर्यटकांनी दिली भेट अन् जमा झाला महसूल

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाच्या कामाचा शुभारंभ!

राणी बागेत सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येत आहे. काचेचे दोन वाॅक थ्रू टनेल असून यातून देश-विदेशातील रंगीबेरंगी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाचे काम सुरू झाले आहे.

‘आरएसी बर्थ’ मिळाल्यास रेल्वेने अंशत: भाडे परत करावे; संसदीय समितीची सूचना

Navi Mumbai : गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना धक्का; महापौर-उपमहापौरपदाची निवड बिनविरोध

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण : पाच आरोपींना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सत्य लोकांसमोर येणे महत्त्वाचे; विमान अपघाताबाबत ९ तारखेनंतर जनतेसमोर येणार - रोहित पवार

पंकजा मुंडेंचा सातारा दौराही रद्द; हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड, हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर