Mumbai : ...तर रहिवाशांना ‘डिम्ड कन्व्हेअन्स’ मिळणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : ...तर रहिवाशांना ‘डिम्ड कन्व्हेअन्स’ मिळणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रवर्तक किंवा विकासक कंपनीविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असली तरी ती रहिवाशांच्या हक्कांच्या आड येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला.

Swapnil S

मुंबई : प्रवर्तक किंवा विकासक कंपनीविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असली तरी ती रहिवाशांच्या हक्कांच्या आड येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला. दिवाळखोरीच्या प्रक्रियेमुळे सक्षम प्राधिकरणाला मोफा कायद्यांतर्गत ‘डिम्ड कन्व्हेअन्स’ मंजूर करण्यापासून रोखता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

बोरिवली पश्चिमेकडील ‘दर्शन मंदिर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी’च्या याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. सोसायटीने उपनिबंधकांकडे डिम्ड कन्व्हेअन्ससाठी अर्ज केला होता. मात्र जमिनीशी संबंधित असलेल्या मेसर्स वास इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीविरुद्ध कॅनरा बँकेच्या अर्जावरून दिवाळखोरीची कारवाई सुरू झाली होती आणि मॉरेटोरियम (स्थगिती) लागू करण्यात आली होती. त्यामुळे आयआरपीने डिम्ड कन्व्हेअन्सला विरोध केला.

जिल्हा उपनिबंधकांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी आयआरपीचा आक्षेप मान्य करत सोसायटीचा अर्ज फेटाळला होता. त्या आदेशाला सोसायटीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती मारणे यांनी उपनिबंधकांचा आदेश बेकायदेशीर ठरवून रद्द केला.

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी