Mumbai : समुद्राचे खारे पाणी गोडे करायला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार; २.३६ किमी लांब बोगद्यातून समुद्राचे पाणी उचलणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : समुद्राचे खारे पाणी गोडे करायला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार; २.३६ किमी लांब बोगद्यातून समुद्राचे पाणी उचलणार

मुंबईला अतिरिक्त पाणी मिळण्यासाठी मुंबई महापालिका समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा मनोरी प्रकल्प राबवत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला अतिरिक्त पाणी मिळण्यासाठी मुंबई महापालिका समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा मनोरी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पात समुद्री जीवाला धोका होऊ नये यासाठी अत्याधुनिक अभियांत्रिकी उपाययोजना आखल्या आहेत. मात्र मच्छिमार संघटनांनी विरोध केला आहे. परंतु मुंबई महापालिका समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यावर पालिका ठाम आहे.

समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २० मीटर खोलीवरून २.३६ किमी लांबीच्या बोगद्याद्वारे पाणी उचलले जाईल. प्रक्रियेनंतर उरणारे अतिक्षारयुक्त पाणी समुद्रात सोडण्यासाठी २.४२ किमी लांबीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.

कामाची ठळक वैशिष्ट्ये

  • पहिल्या टप्प्यात २००, तर दुसऱ्या टप्प्यात २०० असा एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

  • २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या आधुनिक निःक्षारीकरण प्रकल्पामध्ये पूर्व-प्रक्रिया, दुहेरी-टप्पा आरओ आणि पुनर्खनिजीकरण यांचा समावेश आहे.

  • सागरी जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आदान वेग (इंटेक फ्लो ) ≤ 0.15 m/s इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे.

  • पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर उरलेले क्षारयुक्त पाणी समुद्रात शास्त्रोक्त पद्धतीने सोडले जाणार आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे ३०० दशलक्ष लिटर अतिक्षारयुक्त पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाणार आहे. या विसर्गामुळे सागरी पर्यावरण आणि मत्स्यसंपत्तीवर गंभीर परिणाम होईल. तसेच हा प्रकल्प मुंबईकरांवर हजारो कोटी रुपयांचा आर्थिक बोजा टाकणारा आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध असून त्याविरोधात १९ ऑक्टोबरला वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती

मसाल्यात भेसळ केल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड; FDA ची नवी नियमावली जारी

रायगड जिल्ह्यात भात पीक संकटात; लागवडीचे क्षेत्र घटले, दरवाढीची चिन्हे

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द

१ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

ही तर ‘सेटिंग’च - अभिजीत दिपके