प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : सायन रुग्णालयात पोलिसाला मारहाण करणारे दोघे निर्दोष; सत्र न्यायालयाचा सरकारी पक्षाला धक्का

सायन रुग्णालयातील कॅज्युअल्टी विभागात कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपातून दोन व्यक्तींची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पुरेसे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीमुळे न्यायालयाने हा निकाल दिला.

Swapnil S

मुंबई : सायन रुग्णालयातील कॅज्युअल्टी विभागात कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपातून दोन व्यक्तींची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पुरेसे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीमुळे न्यायालयाने हा निकाल दिला. १० वर्षांपूर्वीच्या घटनेत न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे सरकारी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

१६ मार्च २०१६ रोजी सायन रुग्णालयाच्या अपघात विभागात आरोपी शेखर समुद्रपांडी नाडर आणि अक्षय प्रकाश चव्हाण यांनी गोंधळ घातल्याचा आरोप होता. यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेश सुर्वे या पोलीस हवालदाराला आरोपींनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या खटल्यात ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. ए. शेख यांनी आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा! ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहनांना टोलमाफी

...त्यापेक्षा मृत्यू पत्करेन; न्यायाधीशांचे वक्तव्य

पालघर पो. अधीक्षकांना न्यायालयाने केले पाचारण

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस उद्यापासून रोज धावणार

नगरसेवकांना एक कोटीचा निधी; BMC सभागृहाची मंजुरी; विकासकामे मार्गी लावण्यासाठी केली वाढ; आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा