Mumbai : लोकभवनात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या 
मुंबई

Mumbai : लोकभवनात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

मुंबईतील राजभवनात (आताचे लोकभवन) सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना घडली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील राजभवनात (आताचे लोकभवन) सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना घडली आहे.

कोल्हापूरच्या एसआरपीएफ गट क्रमांक १६ मध्ये कार्यरत असलेले कौस्तुभ सांगळे गेल्या काही दिवसांपासून राजभवनात बंदोबस्तासाठी तैनात होते. मात्र सोमवारी रात्री त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून घटनास्थळी सुसाइड नोट आढळून आली आहे. प्रेमसंबंधामुळे नैराश्येत असल्याच्या कारणावरून कौस्तुभने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासावरून समोर आले आहे.

सांगळे सोमवारी राजभवनाच्या टॉवर क्र. २ वर सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत बंदोबस्तावर तैनात होते. दर तीन तासांनी एसआरपीएफच्या जवानांची शिफ्ट बदलते. सांगळे यांची ९ वाजता ड्युटी संपल्यानंतर ते त्यांच्या खोलीत परतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा