Mumbai : डॉ. अमरापूरकरांसारखी दुर्दैवी घटना घडू नये; आधीच्या व आताच्या नाल्याशेजारील सॅटेलाईट ईमेज काढा, गणेश खणकर स्थायी समितीत आक्रमक (Photo- https://www.mcgm.gov.in/)
मुंबई

Mumbai : डॉ. अमरापूरकरांसारखी दुर्दैवी घटना घडू नये; आधीच्या व आताच्या नाल्याशेजारील सॅटेलाईट ईमेज काढा, गणेश खणकर स्थायी समितीत आक्रमक

पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले.

Swapnil S

मुंबई : पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. डेब्रिज टाकले होते, प्लास्टिक बाटल्यांचा खच, ट्रॅश बूमचे कंत्राट मार्च महिन्यात संपले, गोवंडी येथील नाल्यांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे, असा आरोप सभागृह नेते गणेश खणकर यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. दरम्यान, १० वर्षांपूर्वी नाल्याशेजारी काय स्थिती होती आणि आता काय स्थिती होती यासाठी सॅटेलाईट ईमेज काढा, सगळे समोर येईल, असे खणकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पावसाळ्यात डॉ. अमरापूरकर याच्याबाबतीत घडलेली दुर्दैवी घटना घडली तशी घडू नये, याकडे लक्ष द्या, असे खणकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.

नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली, मिठी नदीतील गाळ उपसा होत नाही, ३६०४ गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची ट्रिप झाली असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. याचा अर्थ १० दिवसांत १८०० ट्रिप म्हणजेच एका दिवसात १८० ट्रिप हे कसे शक्य आहे, याची तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत का, मिठी नदीच्या कामात भ्रष्टाचार झाला, असा आरोप काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी स्थायी समितीत केला.

झोनमध्ये नालेसफाईच्या कामासाठी मनुष्यबळ नाही, सभागृह नेते कुठे पाहणी करतात माहीत नाही, पण नालेसफाई किती झाली याची पाहणी करण्यासाठी आम्हाला बरोबर घेऊन जा, असा टोला आजमी यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला. पावसाळा तोंडावर आल्यापासून मुंबईत पाणी तुंबू नये, यासाठी पालिकेत सर्व पक्षीयांकडून नालेसफाईला गांभीर्याने घेतले जात आहे.

नाले अतिक्रमणमुक्त करा!

नालेसफाईच्या मुद्द्यावर पाऊण तास चर्चा झाली, घाटकोपर येथे मंगळवारी पाहणी केली त्या ठिकाणी खाडीजवळ अतिक्रमण झाले, २०११ पर्यंतच्या झोपड्यांना आमच्याच सरकारने संरक्षण दिले. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिणार असून नाले अतिक्रमणमुक्त करा, अशी मागणी करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

...तर कंत्राटदारांवर कारवाई करू

डेब्रिज टाकण्याचा प्रकार, निविदा प्रक्रियेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उल्लेख तर ते आतापर्यंत का बसवले नाहीत, स्थायी समिती सदस्यांनी कुठे पाहणी करायची सांगावे, आम्ही ती पाहणी करू, सादरीकरण नको, प्रत्यक्ष काम बघावे, नालेसफाईच्या कामात दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभाकर शिंदे यांनी दिला.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग