मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के  प्रातिनिधिक फोटो
मुंबई

मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के

बारावीच्या निकालात मुंबई विभागातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा पूर्णपणे शून्य टक्के निकाल लागला आहे, तर सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

Swapnil S

मुंबई : बारावीच्या निकालात मुंबई विभागातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा पूर्णपणे शून्य टक्के निकाल लागला आहे, तर सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे, तर रायगड जिल्ह्यातील एकही कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला नाही.

बारावी निकालात अनेक महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागतो, तर काही महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागतो. यंदाच्या निकालातही मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला, तर सात महाविद्यालयांमधील एका विशिष्ट शाखेचा निकाल शून्य टक्के लागला. यामध्ये ठाण्यातील सर्वाधिक कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. ठाण्यातील एका महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के तर चार महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. पालघरमधील एका महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के, तर चार महाविद्यालयांतील शाखांचा निकाल शून्य टक्के लागला. मुंबईतील एका महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला. जे. के. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आणि महाविद्यालयातील विज्ञान व

वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला, तर कला शाखेचा निकाल शून्य टक्के लागला. मुंबईतील प्रियदर्शनी विद्यामंदिर अॅण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स या महाविद्यालयाचा कला शाखेतून बसलेला एकमेव विद्यार्थी नापास झाल्यामुळे महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला.

ठाण्याची शोकांतिका; एकच विद्यार्थी तोही नापास

ठाणे जिल्ह्यातील अंबाडी येथील गुरुकुल विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतन एकच विद्यार्थी परीक्षेला बसला होता. तोही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने या महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला आहे, तसेच पिंपळास येथील सरस्वती माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी विज्ञान शाखेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून एक विद्यार्थी परीक्षेला बसला होता. त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून ३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तिघेही अनुत्तीर्ण झाले. मात्र, या महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील १० विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कल्याणमधील आर. के. रात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून परीक्षेला बसलेले दोन्ही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर कला शाखेतून बसलेले दोन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे एका शाखेचा निकाल १०० टक्के, तर एका शाखेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

Mumbai : पालिकेचे स्टॉल्स भाऊ-बहिणीच्या नावे नाहीच

मुंबई विभागाचा निकाल घसरला; यंदाचा सर्व शाखांचा निकाल ९०.०८ टक्के, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.८५ टक्के घट

'लालपरी'चा प्रवास महागणार; सरसकट दोन रुपये स्वच्छता अधिभार, शौचालये मोफत