मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या तीन दिवसांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाने १९, २० आणि २१ नोव्हेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या दिवशीच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या तीन दिवसांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाने १९, २० आणि २१ नोव्हेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या दिवशीच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये मतदान केंद्रे असतात. तसेच विद्यापीठाच्या कलिना संकुलातील काही इमारतींमध्येही मतदान केंद्रे आणि निवडणूक अधिकाऱ्यांची कार्यालये असतात.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने १९, २० आणि २१ नोव्हेंबरच्या परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. १९ नोव्हेंबरची परीक्षा ३० नोव्हेंबर, २० नोव्हेंबरची परीक्षा ७ डिसेंबर आणि २१ डिसेंबरची परीक्षा १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती