मुंबई विद्यापीठाच्या कॅन्टीनवरील कारवाईप्रकरणी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी 
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या कॅन्टीनवरील कारवाईप्रकरणी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईनंतर विद्यापीठातील प्रशासकीय जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कारवाईची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईनंतर विद्यापीठातील प्रशासकीय जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कारवाईची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले असून, राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्याकडेही कुलगुरूंना पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

किमान एका सिनेट सदस्याचा समावेश बंधनकारक

२०१० ते २०१५ या कालावधीत विद्यापीठ प्रशासनाकडून कॅन्टीन समिती, क्रीडा समिती, वसतिगृह समिती यांसह विविध समित्यांची स्थापना केली जात होती. या समित्यांमध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या किमान एका सिनेट सदस्याचा समावेश असणे बंधनकारक होते, असा दावा सावंत यांनी केला आहे.

विद्यापीठात पक्षीय राजकारण

अशा समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सर्व सदस्य युवासेनेशी संबंधित असल्याने समित्यांची नियुक्ती टाळण्यात आली का, असा सवाल केला. विद्यापीठासारख्या स्वायत्त संस्थेत पक्षीय राजकारण होत असून याची चौकशी करून कुलगुरूंवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्ज थकवल्यास जामीनदारावर स्वतंत्र कायदेशीर कारवाईला मुभा; सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा; ठाण्यात FDA, पालिकेकडून चौकशी सुरू

आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित; पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा

अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये

रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?