चंद्रकांत पाटील  संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई विद्यापीठातील ८७ अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित; शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांसाठी १५० दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या अंतर्गत आकृतीबंध अद्ययावत करणे, नियुक्ती नियम सुधारित करणे आणि अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करण्यावर भर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित नियुक्त्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भात कालबद्ध नियोजनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात आल्या आहेत. तसेच, अशा सर्व रिक्त जागा १०० टक्के भराव्यात, असे निर्देशही मंत्री श्री.पाटील यांनी बैठकीत दिले.

काळजाचा थरकाप! यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला आग, ९ जणांचा मृत्यू, चालक-वाहकावर प्रवाशांचा गंभीर आरोप

Ulhasnagar : स्वीकृत नगरसेवक निवडीला पुन्हा ‘ब्रेक’! आठ महिन्यांची प्रतीक्षा आणखी वाढली

ठाणे शहराला साथीच्या आजारांचा विळखा! दोन महिन्यांत मलेरियाचे २०८, तर डेंग्यूचे १३८ रुग्ण

Karad : सामाजिक वनीकरणातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करा; वडूज न्यायालयाचे आदेश

Raigad : जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोरीच्या जाळ्यात