मुंबई

Mumbai : भक्ती पार्क सिग्नलवर साखळी अपघात; बेस्ट बसची वाहनांना धडक; पाच जण जखमी, दोन कारचा चक्काचूर

मुंबईत बेस्ट बसच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. वडाळा येथील भक्ती पार्क सिग्नलवर सोमवारी रात्री बेस्ट बसने खासगी बसने वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण साखळी अपघात घडला.

Swapnil S

मुंबई : मुंबईत बेस्ट बसच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. वडाळा येथील भक्ती पार्क सिग्नलवर सोमवारी रात्री बेस्ट बसने खासगी बसने वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण साखळी अपघात घडला. या अपघातात दोन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यापैकी एक कार बेस्ट बसच्या मागील भागाखालीच घुसली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून एका पाळीव कुत्र्यालाही दुखापत झाली आहे. जखमींपैकी काहींना सायन तर दोघांना सोमय्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास भक्ती पार्क सिग्नल येथे हा अपघात झाला. कुलाबा आगारातून गावणगावच्या दिशेने जाणारी बेस्टची बस (एमएच ०१ सीआर ३०१४) सिग्नलवर थांबली होती. तिच्या मागे दोन कारही सिग्नल सुटण्याची प्रतीक्षा करत उभ्या होत्या. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या ‘चलो’ या कंत्राटी बेस्ट बसने (एमएच ४३ सीई १६१२) सर्वात मागील कारला जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे पुढील कार एकमेकांवर आदळल्या आणि त्यातील एक कार थेट बेस्ट बसच्या मागील भागाखाली घुसली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने व बेस्ट बस रस्त्यावरून बाजूला करण्यात आली. सुरुवातीच्या माहितीनुसार पाच प्रवासी आणि एका पाळीव कुत्र्याला दुखापत झाली होती. जखमींना पोलिसांच्या मदतीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघातातील जखमी व्यक्तींची नावे

  • शिवानी पाल ( ६३)

  • हसन शेख (३३)

  • गणेश इंद्रपाल ( ७५ )

  • बालाजी पांडुरंग (३७ )

  • मधू पाल (२८)

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गिरगाव चौपाटीवर छठपूजेला परवानगी देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा तातडीचा दिलासा नाही

पुन्हा ५००, २००० रु.च्या नोटा बंद करा; आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

नंदीग्राम फाईल्स पुन्हा उघडणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा

अमेरिका पाकिस्तानमध्ये राजदूत नेमणार; नताली बेकर यांची वर्णी लागणार? ट्रम्प यांनी केली शिफारस, सिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा

गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का