Mumbai : वडाळ्यातील पाणीपुरवठा सुधारणार; हार्बर रेल्वेमार्गाखालून ९०० मिमीच्या जलवाहिनीचे जाळे, सीमाशुल्क विभागासाठी नव्या स्वतंत्र जलवाहिनी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : वडाळ्यातील पाणीपुरवठा सुधारणार; हार्बर रेल्वेमार्गाखालून ९०० मिमीच्या जलवाहिनीचे जाळे, सीमाशुल्क विभागासाठी नव्या स्वतंत्र जलवाहिनी

वडाळा परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या एफ/उत्तर आणि एफ/पूर्व विभागात दोन महत्त्वाची जलवाहिनी टाकण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : वडाळा परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या एफ/उत्तर आणि एफ/पूर्व विभागात दोन महत्त्वाची जलवाहिनी टाकण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ११ कोटी ३६ लाख ७२ हजार रुपये खर्च करणार आहे. या कामांमुळे जलवाहिनी जाळ्याची क्षमता वाढीसह सीमाशुल्क विभागाच्या प्रस्तावित नवीन इमारतींना पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पहिल्या कामांतर्गत एफ/पूर्व विभागातील आर. ए. किडवाई मार्ग ते शेख मिस्त्री रोड (भाग-ब) दरम्यान, वडाळा पुलाला समांतर असलेल्या हार्बर रेल्वे मार्गिकांखालून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

यासाठी खुल्या चर पद्धतीबरोबरच सूक्ष्म बोगदा पद्धतीचा वापर केला जाणार आहे. रेल्वेमार्गाखालून जलवाहिनी नेण्यासाठी सूक्ष्म बोगदा पद्धतीचा अवलंब केल्याने रेल्वे वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण होईल. तसेच परिसरातील पाणीपुरवठा यंत्रणेला अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.

जलवाहिनीचे जाळे सक्षम करणार

या दोन्ही कामांमुळे वडाळा आणि सॉल्ट पॅन परिसरातील पाणीपुरवठा पायाभूत सुविधांच्या विस्ताराला चालना मिळणार आहे. वाढत्या नागरी आणि संस्थात्मक गरजांच्या पार्श्वभूमीवर, जलवाहिनीचे जाळे सक्षम करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.

६०० मिमी व्यासाची जलवाहिनी

दुसऱ्या कामांतर्गत एफ/उत्तर विभागातील सॉल्ट पॅन परिसरातील सीटीएस क्रमांक १४६ या भूखंडावर प्रधान आयुक्त, सीमाशुल्क (सामान्य) यांच्या प्रस्तावित इमारतीसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शेख मिस्त्री रोड ते चेंबूर-वडाळा लिंक रोडदरम्यान ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी खुल्या चर पद्धतीने टाकली जाणार आहे. त्यामुळे या प्रस्तावित प्रशासकीय इमारतीला आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध! अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नि:संदिग्ध ग्वाही

Tiger Shroff Firing Case : ‘त्या’ आरोपीचे वय तपासा! मकोका न्यायालयाचे पोलिसांना आदेश

Mumbai : नव्या विकासकावर जुन्या विकासकाची देणी लादणे बेकायदा; उच्च न्यायालयाचा निर्णय, महारेराचा आदेश रद्द

देशभरात ६० हजार कोटींची सुवर्ण उलाढाल; सोने खरेदीच्या उत्साहाने धनत्रयाेदशी साजरी

OBC क्रिमिलेअरसाठी पगार, कृषी उत्पन्न आधार नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला धक्का