मुंबईत एक आठवडा ५ टक्के पाणीकपात; जलबोगद्यांचे क्लोरीनीकरण करणार  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईत एक आठवडा ५ टक्के पाणीकपात; जलबोगद्यांचे क्लोरीनीकरण करणार

मुंबईतील जलबोगदा क्रमांक १ आणि २ यांच्या देखभाल कामांमुळे २० ते २७ एप्रिलदरम्यान एल, एम, एन, एस, टी तसेच ए ते एफ विभागांत पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगदा क्रमांक १ व जलबोगदा क्रमांक २ यांचे भरण अर्थात चार्जिंग, तसेच धुलाई अर्थात फ्लशिंग, क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून यासाठी एल (कुर्ला-पूर्व), एम -पूर्व, एम-पश्चिम, एन, एस, टी आणि ए, बी, सी, ई, एफ-उत्तर, एफ-दक्षिण या विभागांत २० ते २७ एप्रिल या कालावधीत पाणीपुरवठ्यात ५ टक्‍के कपात करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठ्याकामी अमर महल ते वडाळा आणि पुढे परळ जलबोगदा १ (एएमटी-१) कार्यान्वित आहे. तसेच, अमर महल (हेगडेवार उद्यान) ते ट्रॉम्बे निम्‍नस्‍तरीय जलाशय आणि पुढे ट्रॉम्बे उच्‍चस्‍तरीय जलाशय जलबोगदा २ हाही अविरत कार्यरत आहे. जलबोगद्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे भरण (चार्जिंग), धुलाई (फ्लशिंग), क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाची कामे हाती घेण्‍यात येणार आहेत. ही सर्व कामे २० ते २७ एप्रिल या कालावधीत केली जाणार आहेत.

या कामामुळे मुंबई पूर्व उपनगरातील एल (कुर्ला पूर्व), एम-पूर्व, एम-पश्चिम, एन, एस, टी आणि मुंबई शहरातील ए, बी, सी, ई, एफ-उत्तर आणि एफ-दक्षिण या विभागात पाणीपुरवठ्यात ५ टक्‍के कपात लागू राहणार आहे.

Mumbai : खोटी विधाने करून कोर्टाची दिशाभूल करणे महागात पडले; हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला १ लाखाचा दंड

Mumbai : सीएसएमटीवरून शेवटची लोकल आज रात्री १०.२८ ला

...अन्यथा घरे जाणार; पत्राचाळवासीयांना निर्वाणीचा इशारा; पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरूंना न्यायालयाचा अल्टिमेटम

सरकारी कर्मचारी, शिक्षक मंगळवारपासून संपावर; सरकारी कार्यालये, शाळा, रुग्णालये ठप्प होणार; विविध मागण्यांसाठी संप

Mumbai : वाहतूककोंडीला अनधिकृत पार्किंग जबाबदार; राज ठाकरेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट