मुंबई

मुंबईकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी अंधेरी, BKC, धारावीसारख्या महत्त्वाच्या भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; जपून पाणी वापरा - BMC

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा आणि काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे...

Krantee V. Kale

मुंबई : मुंबईतील के पूर्व विभाग, एच पूर्व विभाग आणि जी उत्तर विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कार्यवाही शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरु राहणार आहे. परिणामी, के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर के पूर्व विभागात काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील विविध ठिकाणची १८०० मिलीमीटर व्यासाची तानसा पश्चिम जलवाहिनी, १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि जी उत्तर विभागातील १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. ही कामे शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरु राहणार आहे.

BMC कडून आवाहन

यासाठी के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट; रेल्वे ट्रॅकजवळील हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार