मुंबईत पाणीकपात वाढणार? BMC ची राखीव पाण्यासाठी फिल्डिंग, ७ धरणांत फक्त ८२.४७ टक्के पाणी, ६ महिने आधीच राज्य सरकारला पत्र प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईत पाणीकपात वाढणार? BMC ची राखीव पाण्यासाठी फिल्डिंग, ७ धरणांत फक्त ८२.४७ टक्के पाणी, ६ महिने आधीच राज्य सरकारला पत्र

यंदा पावसाने लवकर फिरवलेली पाठ, त्यात प्रचंड उकाड्यामुळे धरणांतील पाणीसाठ्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यामुळे सातही धरणांत सद्यस्थितीत ८२.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर शहरात १५ मे पासून लागू करण्यात आलेल्या १० टक्के पाणी कपातीत आणखी वाढ होण्याचे संकट गडद झाल्याचे दिसत आहे.

Swapnil S

मुंबई : यंदा पावसाने लवकर फिरवलेली पाठ, त्यात प्रचंड उकाड्यामुळे धरणांतील पाणीसाठ्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यामुळे सातही धरणांत सद्यस्थितीत ८२.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर शहरात १५ मे पासून लागू करण्यात आलेल्या १० टक्के पाणी कपातीत आणखी वाढ होण्याचे संकट गडद झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १३ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे आता राखीव पाणीसाठा मिळावा यासाठी मुंबई महापालिका एप्रिल मे महिन्यात राज्य सरकारला पत्र देते ते पत्र यावेळी सहा महिने आधीच लिहिले आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असेच संकेत प्राप्त होत आहेत.

मोडक सागर, तानसा, भातसा, मध्य वैतरणा अप्पर वैतरणा, विहार व तुळशी या धरणातून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागविण्यासाठी सातही धरणांल पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असणे गरजेचे आहे. मात्र यंदा वरुणराजाने पाठच फिरवल्याने ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सातही धरणात ११ लाख ९३ हजार ६४७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.‌

पाणी नियोजनासाठी सहा महिने आधीच पत्र

तसेच ‘एल नीनो’चा प्रभाव असल्याने २०२७ मध्ये कधी व किती पाऊस बरसेल याची शाश्वती नाही. त्यामुळे ऑगस्ट २०२७ चे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर उभे आहे. त्यामुळे २०२७ चे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई पालिकेने राज्य सरकारला राखीव पाणीसाठा मिळावा यासाठी सहा महिने आधीच पत्र लिहिल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

धरणांतील ८ नोव्हेंबर रोजीचा पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा - २,१०,६५३

  • मोडक सागर - ६३,८६२

  • तानसा - १,१४,९१३

  • मध्य वैतरणा - १,५९,५७५

  • भातसा - ६,१२,५४५

  • विहार - २५,२२८

  • तुळशी - ६,८७२

तीन वर्षांची ८ ऑक्टोबरची स्थिती

२०२६ - ८२.४७ टक्के

२०२५ - ९५ टक्के

२०२४ - ९१.८० टक्के

सरकारकडून प्रतिसाद

पाण्याच्या कमतरतेमुळे गतवर्षी पालिकेला भातसा धरणातून १४७०९२ दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९२०० हजार दशलभ लिटर पाणी मिळाले होते. मात्र यावर्षी पाण्याची कमतरता पाहता पालिकेने सरकारकडे किमान १० ते २० टक्के वाढीव पाण्याची मागणी केली असता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित