संग्रहित छायाचित्र 
मुंबई

धरणांत ‘थेंबे थेंबे तळे साचे’! पावसाची उघडझाप, पाणी पातळी जैसे थे

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाचे ‘थेंबे थेंबे तळे साचे’ अशी परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असताना पाण्याची पातळी स्थिरावली आहे. धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात चार दिवसांत फक्त ०.१ टक्क्यांची घट झाली आहे. धरणक्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू असून पुढील काही दिवसांत वरुणराजाची दमदार बॅटिंग होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

भातसा व अप्पर वैतरणा वगळता अन्य पाच तलावामध्ये २१ जूनला ७६ हजार ९०९ दशलक्ष लिटर म्हणजे ५.३१ टक्के पाणीसाठा होता. २४ जून पर्यंत हा साठा ७६ हजार ७१५ दशलक्ष लिटर म्हणजेच ५.३० टक्के इतका झाला. म्हणजेच चार दिवसात सरासरी १९४ दशलक्ष लिटर पाण्याची घट झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसेल, अशी अपेक्षा असून पुढील काही दिवसांत दमदार बॅटिंग झाल्यास लवकरच पाणी कपातीतून मुंबईकरांची सुटका होईल, असा विश्वास जल विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षी मुंबईकरांवर १० टक्के पाणीकपातीचे संकट जुलै महिन्यापर्यंत ओढवले होते. यंदाही १० टक्के पाणीकपात करण्यात आली असून त्यात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कमी प्रमाणात का होईना, पण धरणक्षेत्रात वरुणराजाची कृपा होत आहे. २१ जूनपासून धुव्वाधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे १० टक्के पाणीकपात संपुष्टात येईल, अशी आशा मुंबईकरांना होती. मात्र वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

अजूनही धुव्वाँधार पावसाची प्रतीक्षा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात आतापर्यंत १४४ ते ३२४ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे आजूबाजूचे ओढे व छोट्या नदी वाहू लागल्यामुळे हे पाणी तलाव क्षेत्रात जमा होत आहे. त्यामुळे दररोज पाणीसाठ्यात अडीच ते तीन हजार दशलक्ष लिटरने वाढ होत आहे. त्यामुळे तलावक्षेत्रात जोरदार पाऊस होण्याची गरज आहे.

तलाव क्षेत्रातील पाऊस

अप्पर वैतरणा १४४ मिमी

मोडक सागर १७३ मिमी

तानसा २०८ मिमी

मध्य वैतरणा १९३ मिमी

भातसा २२२ मिमी

विहार २९२ मिमी

तुळशी ३२४ मिमी

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला