Mumbai : पश्चिम रेल्वेवर आज रात्री मोठा ब्लॉक; धीम्या मार्गावर ११.३१ वाजता शेवटची लोकल (संग्रहित छायाचित्र FPJ)
मुंबई

Mumbai : पश्चिम रेल्वेवर आज रात्री मोठा ब्लॉक; धीम्या मार्गावर ११.३१ वाजता शेवटची लोकल

पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकावरील अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी रात्री एक मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकावरील अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी रात्री एक मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२ ते ५ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरून चर्चगेटहून ११.३१ वाजता शेवटची लोकल सुटेल. ब्लॉक कालावधीत महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान धावणाऱ्या सर्व धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गांवरून चालवल्या जातील. परिणामी, फलाटांची अनुपलब्धता आणि त्यांची अपुरी लांबी यामुळे, या गाड्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम या स्थानकांवर थांबणार नाहीत.

तसेच चर्चगेटहून शुक्रवारी रात्री ११.३१ वाजता धीम्या मार्गावरून सुटणारी चर्चगेट वांद्रे लोकल शेवटची गाडी असेल ही गाडी विरारपर्यंत करण्यात येईल. त्याचप्रमाणे, बोरिवलीहून रात्री ११.३ वाजता सुटणारी गाडी अप दिशेकडील शेवटची गाडी असेल. या ब्लॉकच्या कालावधीत काही उपनगरीय सेवा रद्द राहतील.

विद्याविहार पुलासाठी मध्य रेल्वेचा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत विद्याविहार स्थानकावरील मधल्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कुर्ला ते भांडुप विभागादरम्यान विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित (ब्लॉक) करण्यात येणार आहे. हा ब्लॉक १५ ते १८ मेदरम्यान सलग तीन रात्री घेण्यात येईल. दिनांक १५/१६ मे रोजी रात्री १.१५ ते पहाटे ४.१५, १६/१७ मे रोजी रात्री १२.१० ते पहाटे ४.४० आणि १७/१८ मे रोजी रात्री १.१५ ते पहाटे ३.०५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. पहिल्या आणि तिसऱ्या रात्री उपनगरी गाड्यांवर परिणाम होणार नाही.

Mumbai : बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव! गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त गणपती 'विशेष गाड्या'; पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा, LTT आणि मडगाव दरम्यान ४ गाड्या

मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र'; अधिकाऱ्यांना पुढची जबाबदारी कामगिरीनुसार, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य

महाराष्ट्र स्वतंत्र डेटा सेंटर धोरण तयार करणार