म्हाडा मुंबई लॉटरी : एका घरासाठी ३७ उमेदवारांमध्ये चुरस 
मुंबई

म्हाडा मुंबई लॉटरी : एका घरासाठी ३७ उमेदवारांमध्ये चुरस

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या २०२६ च्या गृहनिर्माण लॉटरीला मुंबईकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.

प्रतिनिधी

स्विटी भागवत/मुंबई

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या २०२६ च्या गृहनिर्माण लॉटरीला मुंबईकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. मुदतवाढ संपल्यानंतर या लॉटरीसाठी आलेल्या अर्जांचा आकडा आता तब्बल एक लाखाच्या घरात पोहोचला आहे.

म्हाडाकडून शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, म्हाडाच्या २,६४० घरांसाठी एकूण ९७,६१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ७२,४३८ अर्जदारांनी अनामत रक्कम (ईएमडी) जमा केली. एकूण अर्जांचा विचार केला तर एका घरासाठी ३७ अर्जदार, तर अनामत रक्कम भरलेल्या उमेदवारांचा विचार केला, तर एका घरासाठी २७ दावेदार आहेत.

विक्रोळीतील घरांना पसंती

विविध उत्पन्न गटांसाठी उपलब्ध असलेल्या २ हजार ६४० घरांपैकी सर्वाधिक १ हजार २२१ घरे विक्रोळी पूर्व येथील कन्नमवारनगर प्रकल्पात आहेत. या ठिकाणी म्हाडाने येथील घरांच्या किमतीत ७.५ टक्क्यांची कपात केली होती. या प्रकल्पात उच्च उत्पन्न गटासाठी (एचआयजी) ६१० अपार्टमेंट्स आरक्षित असून विजेत्यांना एक पार्किंग स्पेस मोफत दिली जाणार आहे.

विक्रोळीव्यतिरिक्त मुंबईतील इतर महत्त्वाच्या भागांतही ही घरे उपलब्ध आहेत. यात गोरेगाव येथील पत्रा चाळ (सिद्धार्थनगर), बोरिवलीतील जुने मागाठणे आणि गोराई तसेच चेंबूरमधील सुभाषनगर येथील घरांचा समावेश आहे.

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण : पार्थ पवारांविरुध्द गुन्ह्यासाठी याचिका

Ulhasnagar : स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांसाठी रणधुमाळी; न्यायालयाच्या दणक्यानंतर निवडणुकीचा बिगुल, २४ सप्टेंबरला विशेष महासभा

MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांनी दिली सरकारला एक आठवड्याची मुदत

कुनो अभयारण्यात चित्त्याच्या चार पिलांचा जन्म