मुंबई

मुंबईच्या हवेची गुणवत्ता बिघडली; महापालिकेकडून कठोर नियमावली जारी

मुंबईसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात देखील वायु प्रदुषणात भर पडली आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबईतील हवेत मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झालं आहे. मुंबईत वाढणारे हवेचं प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेकडून कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे. यात हिवाळ्यात शेकोटी पेटवण्यावर देखील बंदी घातली जाणार आहे. याबाबत लवकरच सुधारित नियमावली जाहीर करण्यात येईल. गेल्या २४ तासांत दिल्लीप्रमाणे मुंबईतील काही भागातील हवेची गुणवत्ता बिघडल्याचं चित्र आहे. याच बरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात देखील वायु प्रदुषणात भर पडली आहे.

मुंबईच्या हवेची गुणवत्ता बिघडल्याने याचा परिणाम आरोग्यवार देखील दिसू लागला आहे. राज्य सरकार आणि महापालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली होती. मात्र, ही नियमावली धाब्यावर बसवल्या जात असल्याचं चित्र सर्वत्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत शेकोटीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसंच महापालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊलं उचलण्यात येणार आे. तसंच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे.

महापालिकेची नियमावली

मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी १५ दिवसांत प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. जर या नियमांच लाकल केलं नाही तर जागच्या जागी 'स्पॉप वर्क' नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचचीचे लोखंडी/पत्र्याचे अच्छादन असावं. तसंच संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेलं असावं

धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान ४-५ वेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अ‍ॅन्टी स्मॉग मशीन लावाव्या लागतील. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. सर्व २४ वर्डात सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून गस्त घाल्यात येईल.

हिवाळ्यात सोसायट्यांमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक, बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांकडून शेकोट्या पेटवल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने प्रदुषण वाढते. मुंबईत २०१९ ते २०२३ या कालावधीत ऑक्टोबर PM 2.5 पातळीत सातत्याने वाढ झाली आहे. जे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय घट दाखवतायत. गेल्या महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत मुंबईतील हवेच्या प्रदुषणात ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे परिणाम आरोग्यावर दिसू लागले आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी