मुंबई

Republic Day : येत्या २६ जानेवारीला मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका; शिवाजी पार्कबद्दल घेतला 'हा' निर्णय

येत्या २६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) मुंबईवर हवाई हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे

प्रतिनिधी

२६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी (Republic Day) मुंबईवर हवाई हल्ला होऊ शकतो, असे इनपुट मुंबई पोलिसांना मिळाले आहे. हा हल्ला शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबई पोलिसांकडून दादरच्या शिवाजी पार्कला 'नो फ्लाय झोन' घोषित करण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी उप-पारंपारिक हवाई उड्डाणांवर दिल्लीमध्ये बंदी घातली आहे. तसेच, "दिल्लीमध्ये पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँग-ग्लाइडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, लहान पॉवर एअरक्राफ्टसारख्या हवाई वाहनांना परवानगी नाही," असे आदेश दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी दिले आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस