मुंबई

Mumbai : पोलीस तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तरुणीच्या पालकांविरोधात गुन्हा

सांताक्रूझ पूर्व येथील कलिना पोलीस मुख्यालयात, एका पोलिसाने गळफास लावून कथित आत्महत्या केली. आपले एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, पण मुलीच्या वडिलांचा लग्नाला विरोध असल्याने आपण जीवन संपवत असल्याचे त्याने मृत्यूपूर्व चिठ्ठीत नमूद केले.

Swapnil S

मेघा कुचिक / मुंबई

सांताक्रूझ पूर्व येथील कलिना पोलीस मुख्यालयात, एका पोलिसाने गळफास लावून कथित आत्महत्या केली. आपले एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, पण मुलीच्या वडिलांचा लग्नाला विरोध असल्याने आपण जीवन संपवत असल्याचे त्याने मृत्यूपूर्व चिठ्ठीत नमूद केले.

मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून, वाकोला पोलिसांनी सोमवारी त्या तरुणीच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृत भय्यासाहेब व्हावले याची पोलीस दलात चालक म्हणून निवड झाली होती. १५ मार्च रोजी मुलाने कथित आत्महत्या केली. आपल्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती वाकोला पोलिसांनी त्यांच्या पालकांना कळवली.

मृताच्या खिशात पत्र सापडले होते. त्यात नमूद केले की, त्याचे ‘दिव्या जाधव’ हिच्याशी प्रेमसंबंध होते. तिच्या पालकांनी तिच्या लग्नासाठी वर शोधण्यास सुरुवात केली होती. दिव्याने पालकांना व्हावलेसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दिव्याचे वडील आनंद जाधव यांनी कथितपणे फोनवरून व्हावलेशी संपर्क साधून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

दिव्याच्या वडिलांनी व्हावलेच्या पालकांशीही संपर्क साधून त्यांनाही धमकावले. दिव्याच्या पालकांच्या दबावामुळेच त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, असा संशय आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड