मुंबई

पालिका सॅनिटरी पॅड आणि डायपरचा कचरा वेगळा उचलणार; पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी करणार प्रयत्न

मुंबईमध्ये सॅनिटरी पॅड आणि डायपरपासून तयार होणाऱ्या ५२० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका याचे संकलन ओला-सुका कचऱ्याबरोबर न करता वेगळे करण्याच्या विचारात आहे.

Swapnil S

मुंबई / पूनम पोळ

मुंबईमध्ये सॅनिटरी पॅड आणि डायपरपासून तयार होणाऱ्या ५२० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका याचे संकलन ओला-सुका कचऱ्याबरोबर न करता वेगळे करण्याच्या विचारात आहे. यासाठीचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. सॅनिटरी पॅड आणि डायपरपासून तयार होणाऱ्या कचऱ्याचे विघटन लवकर होत नसल्याने पर्यावरणीय प्रश्न निर्माण होत आहे. या कारणास्तव सदर प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईत सोसायट्यांमधून सॅनिटरी पॅड आणि डायपर हे ओला आणि सुका कचऱ्यासोबतच फेकले जातात. त्यामुळे कचरा विलगीकरण करताना अडचणी निर्माण होतात. तर या कचऱ्याचे विघटनही लवकर होत नाही. यासाठी पालिकेने सॅनिटरी पॅड आणि आरोग्यविषयक कचऱ्याचे वेगळे संकलन करण्यासाठी विविध स्तरावर अभियान राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पालिका प्रशासन सुरुवातीला ५००० सोसायट्यांमध्ये जनजागृती करणार आहे. तसेच ज्या सोसायट्या सॅनिटरी पॅड वेगळे करण्यास स्वारस्य दाखवणार आहे. त्यांच्यासाठीही पालिका सुविधा उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान सॅनिटरी कचरा आणि डायपर गोळा करण्यासाठी पालिका पिवळ्या रंगाची विशेष बॅग नागरिकांना देणार आहे. तर हा कचरा वेगळा नेण्यासाठी पालिकेच्या वतीने छोट्या कचरागाडीचा वापर करण्यात येणार आहे.

सॅनिटरी पॅड वेगळे करण्यासाठी जनजागृती करणार

समाजात सॅनिटरी पॅड आणि डायपरच्या कचऱ्याचे संकलन करण्याचे प्रबोधन करण्यासाठी पालिका एका खासगी संस्थेची नियुक्ती करणार आहे. जे लोकांमध्ये जाऊन जनजागृती करतील तसेच आरोग्यविषयक कचरा पिवळ्या पिशवीतच टाकण्याचे आव्हान करतील.

प्लाज्मा बर्निंग मशीन नव्याने सुरू करणार

काही वर्षांपूर्वी पालिकेच्या वतीने सॅनिटरी पॅड जाळण्यासाठी विविध ठिकाणी प्लाज्मा बर्निंग मशीन बसवण्यात आल्या होती. मात्र, या मशीन सद्यस्थितीत बंद आहे. त्या मशीन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

असा होतो पर्यावरणावर परिणाम

सॅनिटरी पॅड्स जाळल्यानंतर निर्माण होणारे वायू वातावरणास धोकादायक असतात. हे पॅड्स जमिनीत पुरल्यानंतरही ते शेकडो वर्ष विघटित न झाल्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होते. या कचऱ्यामुळे पॅड्स वापरणारी व्यक्ती, सफाई कर्मचारी, सामाजिक आरोग्य व पर्यावरण या सगळ्यांवर विपरीत परिणाम होतो.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन