मुंबई

नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन बिघडल्याने रुग्णांना ताप

एमआरआय मशीन बिघडणे ही बाब पहिल्यांदा झालेली नाही. नायर रुग्णालयातील या बिघाडामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीला ‘नवशक्ति’ने वाचा फोडली आहे.

Swapnil S

स्वप्नील मिश्रा/मुंबई : मुंबई मनपाच्या नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन बिघडल्याने रुग्णांच्या डोक्याला ताप झाला आहे. कारण या रुग्णांना एमआरआय करण्यासाठी खासगी निदान केंद्रात जावे लागत आहे.

गेल्या डिसेंबरपासून नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन नादुरुस्त आहे. या मशीनला लागणारा हेलियम गॅस व सुटे भाग उपलब्ध झालेले नाहीत. तसेच ही मशीन दुरुस्त करायला तंत्रज्ञ मिळत नाहीत. रोज ३० रुग्णांना एमआरआय करण्याची शिफारस केली जाते.

मुंबई मनपाने गेल्या सप्टेंबरमध्ये एमआरआय मशीन बिघडल्यावर १५ लाख रुपयांचा हेलियम गॅस खरेदी केला होता. तसेच या मशीनचे देखभालीचे कंत्राट जानेवारीपर्यंत होते. त्यानंतर उत्पादकाने त्याची देखभाल करण्यास नकार दिला. पण, रुग्णालयाच्या सूत्रांनी हे मशीन वापरण्याचा सल्ला दिला. तसेच नवीन मशीन खरेदीची निविदा काढल्याचे सांगितले. पण, केव्हा येईल, याचा तपशील देण्यास असमर्थता दर्शवली.

नायरचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर म्हणाले की, या मशीनला अडचणी येत आहेत. यातील नेमका कोणता पार्ट खराब झालेला आहे, त्याचे कारण कळू शकत नाही. आम्ही आठवड्यात दोन वेळा हेलियम वायू आणला. नवीन एमआरआय मशीन आणेपर्यंत किंवा जुने मशीन दुरुस्ती होईपर्यंत रुग्णांना मुंबई मनपाच्या अन्य रुग्णालयात पाठवले जात आहे. रुग्णालयाच्या शेजारील एमआरआय मशीन केंद्रे मुंबई मनपाच्याच दरात सेवा पुरवत आहेत. त्यांनी वाडिया रुग्णालयासोबत करार केला आहे, असे ते म्हणाले.

एमआरआय मशीन बिघडणे ही बाब पहिल्यांदा झालेली नाही. नायर रुग्णालयातील या बिघाडामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीला ‘नवशक्ति’ने वाचा फोडली आहे. रेडिओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एमआरआय मशीनबाबत आम्ही वेळोवेळी वरिष्ठांना सांगितले आहे. तरीही हा प्रश्न सोडवलेला नाही.

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...