(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

जेट एअरवेजचे माजी संस्थापक नरेश गोयल यांना दिलासा; वैद्यकीय उपचारासाठी जामीन मंजूर

जेट एअरवेजचे माजी संस्थापक नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. टाटा कॅन्सर रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी मंजूर करण्यात आलेला अंतरिम जामीन न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी कायम स्वरूपी वैद्यकीय जामीन मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : जेट एअरवेजचे माजी संस्थापक नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. टाटा कॅन्सर रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी मंजूर करण्यात आलेला अंतरिम जामीन न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी कायम स्वरूपी वैद्यकीय जामीन मंजूर केला.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जेट एअर वेजचे माजी संचालक नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने २ महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. त्याची मुदत संपत असल्याने जामीनाची मुदत आणखी वाढवावी, अशी विनंती करणारी याचिका गोयल यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

त्यावर न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या समोर सुनावणी झाली. गोयल यांच्यावर सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची दखल घेत न्यायालयाने अंतरिम जामीन कायम करत याचिका निकाली काढली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक