Mumbai : मंत्रिमंडळ बैठकीला नरहरी झिरवाळ अनुपस्थित 
मुंबई

Mumbai : मंत्रिमंडळ बैठकीला नरहरी झिरवाळ अनुपस्थित

तृतीयपंथी व्यक्ती-सोबतच्या आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओमुळे वादग्रस्त ठरलेले राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली.

Swapnil S

मुंबईः तृतीयपंथी  व्यक्ती-सोबतच्या आक्षेपार्ह  स्थितीतील व्हिडीओमुळे वादग्रस्त ठरलेले राज्याचे  अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी  झालेल्या  राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे  पाठ फिरवली. आज मंत्रिमंडळ बैठकीत झिरवाळ प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. पण तरीही झिरवाळ यांनी आज  बैठकीपासून दूर राहणे पसंत केले. यासंदर्भात पत्रकारांनी झिरवाळ यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता ते गावी असल्याचे त्यांच्या सांगण्यात आले.

दरम्यान, वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी पोलीस तक्रार झाल्याने झिरवाळ यांना या प्रकरणातून अभय  मिळण्याची शक्यता वाढली आहे. हा व्हिडिओ जुना आहे आणि त्याची छेडछाड करून तो बनवण्यात आला आहे.  झिरवाळ यांनी याविषयी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून भूमिका मांडली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झिरवाळ यांच्यावर कारवाई होऊ नये,असा मतप्रवाह आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप  वाजताच  झिरवाळ यांचा कथित वादग्रस्त व्हिडीओ वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून पुढे आला. या प्रकरणानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक होती. त्यामुळे सर्व माध्यम प्रतिनिधींचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीकडे लागले होते. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सभागृहाच्या बाहेर माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते पण नरहरी झिरवाळ  मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय