मुंबई

राष्ट्रीय लोकअदालत डीआरटी-३ चे आयोजन

राष्ट्रीय लोकअदालत कर्ज वसुली न्यायाधिकरण-३ (डीआरटी-३), मुंबई येथे प्रभारी अध्यक्ष श्रीकला सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कर्ज वसुली न्यायाधिकरण-३ (डीआरटी-३), मुंबई येथे प्रभारी अध्यक्ष श्रीकला सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोकअदालतीत १२२ प्रकरणांचा सौहार्दाने निपटारा करण्यात आला आणि रु. ४३.६९ कोटींची वसुली करण्यात आली. लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी (DLSA) सल्लामसलतीने आयोजित करण्यात आली होती.

लोकअदालतीचे अध्यक्षपद माजी अध्यक्ष व्ही. एन. लोधे-पाटील यांनी भूषविले.

पॅनेल सदस्य म्हणून कॅनरा बँकेचे डीजीएम सुधांशु एस. साहू आणि अधिवक्ता सुनील हम्बरे उपस्थित होते. डीआरटी-III, मुंबईचे निबंधक संजय जायसवाल यांनी सांगितले की, लोकअदालतीचे सुरळीत आयोजन करण्यासाठी न्यायाधिकरणातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या लोकअदालतीत डीआरटी-३, मुंबईतील स्नेहल तळाशीलकर (सहाय्यक निबंधक), पर्वेश शर्मा, मिलिंद खातू, सतीश बोराडे, राजन कांबळे, नरेंद्र महामुंकर, पवन मीणा, प्रवीण लबडे, किशोर इंदुलकर, अमरेंद्र आणि प्रियांका गुरव या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार