PM
मुंबई

पाकला गुप्त माहिती पुरवणारा नौदल कर्मचारी एटीएसच्या ताब्यात

भारतीय संशयित हा पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती पुरवत असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली

नवशक्ती Web Desk

मुंबई : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला देशातील गुप्त व संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील गौरव पाटील या नौदल कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

आयटीआयचा अभ्यासक्रम झाल्यानंतर नौदल डॉकयार्डमध्ये काम करणाऱ्या गौरव पाटील या २३ वर्षीय मुलाला अटक झाली आहे. भारतीय संशयित हा पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती पुरवत असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली. संबंधित संशयित भारतीय व्यक्ती हा पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या संपर्कात असल्याचे कळले. एटीएसने संशयिताची चौकशी सुरू केली आहे. एप्रिल/मे २०२३ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान फेसबुक व व्हॉटस‌्ॲॅपवरून दोन पाकिस्तानी हेरांसोबत भेट झाली, असे त्याने चौकशीत सांगितले. संबंधित संशयिताने गुप्त माहिती पाकिस्तानला फेसबुक व व्हॉटसॲॅपच्या माध्यमातून पुरवली. भारत सरकारच्या प्रतिबंधित क्षेत्रातील ही माहिती होती. या बदल्यात त्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडून ऑनलाईन पैसे पाठवण्यात आले. ते पैसे त्याने स्वीकारले, असे एटीएसने सांगितले.

एटीएसने पाटील व त्याच्याशी संपर्कात तिघांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताने नेमकी कोणती माहिती जाहीर केली, हे सांगण्यास एटीएस अधिकाऱ्यांनी नकार दिला.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’