मुंबई : आर्थिक अफरातफर प्रकरणात पालिका निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत सापडलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. मलिक व इतरांविरुद्ध दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या खटल्यांतर्गत विशेष न्यायालयातील कार्यवाहीला न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
विशेष पीएमएलए न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये नवाब मलिक व इतर तिघांविरुद्ध आरोप निश्चित केले होते. त्यामुळे मनी लॉड्रिंगच्या खटल्याचा मार्ग मोकळा झाल्याने मलिक यांची चिंता वाढली होती. त्याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असलेल्या आणि आरोपपत्रासोबत दाखल न केलेल्या कागदपत्रांचा तपशील मागवणारी मलिक यांची याचिका
विशेष न्यायालयाने फेटाळली होती. मलिक यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी सुनावणी घेतली. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवाब मलिक व इतर आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते. विशेष न्यायालयाच्या त्या आदेशाला अंतरिम स्थगिती देत न्यायमूर्ती चांडक यांच्या एकलपीठाने कागदपत्रांची करण्यासाठी पुढील सुनावणी निश्चित केली. यावेळी ईडीने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे. खटल्याला अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यादी सादर