संग्रहित छायाचित्र  
मुंबई

राष्ट्रवादीचे मुस्लिम वोटर कार्ड; BMC निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वात

राष्ट्रवादीचे नेते मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जाणारे नवाब मलिक यांच्या खांद्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मलिक यांच्या वर सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जाणारे नवाब मलिक यांच्या खांद्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मलिक यांच्या वर सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.

मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक- शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची नियुक्ती केली.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल