NCB चा डी-कंपनीला धक्का; कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाला मुंबईत आणले; आज कोर्टात करणार हजर एक्स
मुंबई

NCB चा डी-कंपनीला धक्का; कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाला मुंबईत आणले; आज कोर्टात करणार हजर

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कीहून प्रत्यार्पण करून मंगळवारी दिल्लीत आणण्यात एनसीबीला यश आले होते.

Krantee V. Kale

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बुधवारी संध्याकाळी दिल्लीहून मुंबईत आणले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक डोला याला घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यानंतर त्याला दक्षिण मुंबईतील एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

तुर्कीहून प्रत्यार्पण करून मंगळवारी डोला याला दिल्लीत आणण्यात एनसीबीला यश आले होते. भारत सरकारच्या विनंतीवरून मार्च २०२४ मध्ये इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे ५९ वर्षीय डोला याला तुर्कीमध्ये अटक करण्यात आली होती. तो भारतातील अमली पदार्थ तस्करीच्या अनेक प्रकरणांमध्ये हवा होता आणि गेल्या काही काळापासून सुरक्षा यंत्रणांना चकवा देत होता. दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी डोला याला मुंबईत नेण्यासाठी एनसीबीला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली होती.

३१ डिसेंबर १९६६ रोजी जन्मलेला डोला हिंदी आणि मराठी भाषा बोलतो. त्याच्यावर ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत अनेक गंभीर आरोप आहेत.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२