संग्रहित छायाचित्र 
मुंबई

शरद पवारांची राष्ट्रवादी BMC तून आऊट; एक नगरसेवक असल्याने पक्ष कार्यालयाला मुकावे लागणार

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आल्याने त्यांना मुख्यालयात पक्ष कार्यालयाला मुकावे लागणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेत ज्या पक्षाचे एकहून अधिक नगरसेवक निवडून आले, त्या पक्षाला पालिका मुख्यालयात पक्ष कार्यालय मिळवणे सहज शक्य होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आल्याने त्यांना मुख्यालयात पक्ष कार्यालयाला मुकावे लागणार आहे. तर सपा, एमआयएम, मनसे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एका पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षाला पालिका मुख्यालयात कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन मिळणार आहे. मात्र संबंधित पक्षांना पक्ष कार्यालयासाठी जागा मिळावी, कोकण आयुक्तांकडून लेखी लिहून आणणे बंधनकारक असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आला आहे. ज्या पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले, त्या पक्षाला पालिका मुख्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात येते. एमआयएमचे ८, मनसेचे ६, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ३ व समाजवादी पक्षाचे २ नगरसेवक निवडून आले. या पक्षांना पक्ष कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून हवी आसल्यास कोकण आयुक्तांकडे या पक्षांना जागेचा दावा करणारे पत्र द्यावे लागेल. त्यानंतर कोकण आयुक्तांकडून पालिकेला लेखी पत्र प्राप्त झाल्यावर मुख्यालयात जागा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दोन शिवसेनेसाठी दोन कार्यालये

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन केली. त्यावेळेपासून लोकसभा, विधानसभा व राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन शिवसेना आमनेसामने उभे ठाकले होते. मुंबई महापालिकेत शिंदे सेनेचे २९ नगरसेवक निवडून आले असूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत ठाकरे सेनेचे कार्यालय असून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी पक्ष कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भीषण अपघात! Air Canada Express विमानाची फायर ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी, VIDEO

Mumbai : मोबाईल चोरी प्रकरणाचा उलगडा; आरोपी टिपू सुलतानला पश्चिम बंगालमधून अटक

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन