@ANI
मुंबई

मला खात्री, केंद्राला 'त्यांच्या'विरुद्ध कारवाई करावीच लागेल; असं का म्हणाले शरद पवार?

महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चाला परवानगी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आपले मत

प्रतिनिधी

राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या महामोर्चा परवानगी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "महाविकास आघाडीचा मोर्चा हा सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून असेल. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल." तसेच, "राज्यपालांनी ज्या पद्धतीचे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढले ते चुकीचे होते. मला खात्री आहे आज ना उद्या केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल." असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शविला.

शरद पवार यावेळी म्हणाले की, "मोर्चासाठी परवानगी मिळाली याबाबत मला आश्चर्य वाटत नाही. कारण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, लोकशाहीमध्ये आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची बघ्याची भूमिका आहे, याबद्दल नागरिकांच्या मनात संताप आहे. मी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ऐकलं होतं, ते म्हणाले होते मोर्चा हा लोकशाहीत अधिकार, त्यामुळे परवानगी मिळेल यात शंका नव्हती. डॉ. आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबाबत जबाबदार माणसांनी केलेली वक्तव्ये सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या सर्वांना मुंबईच्या महामोर्चामध्ये दिसेल."

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश