पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; नेरळ-माथेरान 'मिनी ट्रेन' आजपासून पुन्हा धावणार, बघा वेळापत्रक संग्रहित छायाचित्र
मुंबई

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; नेरळ-माथेरान 'मिनी ट्रेन' आजपासून पुन्हा धावणार, बघा वेळापत्रक

शनिवार-रविवारी प्रवाशांच्या सोयीसाठी माथेरान-अमर लॉज दरम्यान दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन अतिरिक्त विशेष फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीत नेरळ-माथेरान रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. आता शुक्रवारपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू होणार आहे. माथेरान आणि अमन लॉजदरम्यान धावणाऱ्या शटल सेवाही नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.

नेरळहून माथेरानला जाणारी पहिली गाडी सकाळी ८.५० वाजता सुटून ११.३० वाजता माथेरानला पोहोचेल. दुसरी गाडी सकाळी १०.२५ वाजता सुटून दुपारी १.०५ वाजता माथेरानला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी माथेरानहून दुपारी २.४५ आणि ४ वाजता गाड्या सुटतील. त्या अनुक्रमे सायंकाळी ५.३० आणि ६.४० वाजता नेरळला पोहोचतील. या मार्गावरील दोन्ही गाड्या सहा डबे असणार आहेत. यामध्ये तीन द्वितीय श्रेणीचे, एक विस्टाडोम डबा आणि दोन द्वितीय श्रेणी-सह-सामान डबे यांचा समावेश असेल. तर अन्य गाडीला तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणी-सह-सामान डबे असतील.

अमन लॉज-माथेरान शटलच्या सहा फेऱ्या

अमन लॉज-माथेरानदरम्यान दररोज सहा शटल फेऱ्या चालवण्यात येतील. अमन लॉजहून सकाळी ८.४५ वाजल्यापासून सायं. ५.४५ वाजेपर्यंत विविध वेळांना गाड्या सुटतील. तर, माथेरानहून अमन लॉजसाठी सकाळी ८.२० ते सायं ५.२० वाजेपर्यंत विविध वेळांना गाड्या सुटतील.

अमन लॉज ते माथेरान वेळापत्रक : सकाळी ८.४५, ९.३५, दुपारी १२, २.२५, ३.४० आणि सायंकाळी ५.४५ वाजता

माथेरान ते अमन लॉजसाठी वेळापत्रक : सकाळी ९.१०, ११.३५, दुपारी २, ३.१५ आणि सायंकाळी ५.२० वाजता

शनिवार-रविवारी विशेष सेवा

शनिवार आणि रविवारी प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

विशेष सेवेचं वेळापत्रक

अमन लॉज येथून १०.३० वाजता सुटेल, माथेरान येथे १०.४८ वाजता पोहोचेल

अमन लॉज येथून १३.३५ वाजता सुटेल, माथेरान येथे १३.५३ वाजता पोहोचेल

माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल, अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहोचेल

माथेरान येथून १३.१० वाजता सुटेल, अमन लॉज येथे १३.२८ वाजता पोहोचेल

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘एमसीए’ने 'एनसीएलटी'वर पूर्णपणे ताबा मिळवलाय; सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

नाशिक : ध्वजारोहणासाठी गोदाकाठ सजला; राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी डीएमएक्स पिक्सेल थ्रीडी मॅपिंगसह आकर्षक रोषणाई

Thane : अखेर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; शिवसेना पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी पद सोडण्याचा निर्णय

'नागपूरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' - चंद्रशेखर बावनकुळे

२०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलावलेच नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस